-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

महायुती पॅनलच्या प्रचारार्थ राम सातपुतेंची चिखलठाण येथे सभा; अकलूजकरांवर कोणती तोफ डागणार? सभासदांमध्ये उत्सुकता!

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

आदिनाथ सहकारी साखर कारखाना निवडणुकीनिमित्त प्रचार आता शिगेला पोहोचला असून प्रचारासाठी महायुती व महाविकास आघाडी कडून स्टार प्रचारक निवडणूक रिंगणामध्ये उतरविले जात आहेत. महायुती आदिनाथ बचाव पॅनलच्या आज चिखलठाण नं.१ येथे सायंकाळी ७.०० वाजता होणाऱ्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे निकटवर्तीय माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रामजी सातपुते हे आवर्जून उपस्थित राहणार असून अकलूजकरांवरती ते कोणती तोफ डागणार याची उत्सुकता करमाळा तालुक्यातील सभासदांना आता लागलेली आहे.

 

आदिनाथच्या प्रचारामध्ये महायुती आदिनाथ बचाव पॅनलने आघाडी घेतली असून आता शेवटच्या टप्प्यात निर्णायक अवस्थेमध्ये स्टार प्रचारक म्हणून राम सातपुते आज चिखलठाण १ येथे येणार आहेत. या प्रचार सभेसाठी माजी आमदार संजयमामा शिंदे हे प्रमुख उपस्थितीत असणार आहेत. त्यांच्याबरोबरच बारामती ऍग्रो चे व्हॉइस चेअरमन सुभाष गुळवे तसेच भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे हे उपस्थित राहणार आहेत.

 

या प्रचार सभेसाठी सभासद, शेतकरी व मतदार यांनी मोठ्या संख्येने चिखलठाण नं. १ येथे उपस्थित रहावे. असे आवाहन माहिती आदिनाथ बचाव पॅनल मधील जेऊर ऊस उत्पादक गटाचे उमेदवार चंद्रकांत काका सरडे यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close