-->
करमाळामाहिती विषयकविशेष

पूनवर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना; पोलिस प्रशासनाकडून पाहणी

 

प्रतिनिधी करमाळा l (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्यातील चिकलठाण नंतर पूनवर येथे शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारला आहे. मंगळवार दि. १० मार्च रोजीच्या पहाटे गावातील शिवभक्तांच्या पुढाकारातून छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्यामुळे परिसरात शिवभक्तांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून गावाच्या प्रवेशद्वाराला ऐतिहासिक व प्रेरणादायी स्वरूप प्राप्त झाले आहे.

 

पूनवर येथे उभारण्यात आलेला हा पुतळा अश्वारूढ स्वरूपातील असून चौथऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षक चित्र तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक, पूनवर ता. करमाळा जि. सोलापूर” अशी नोंद करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी गावातील शिवप्रेमींनी मोठा सहभाग घेतला. या पुतळा उभारणीसाठी छत्रपती संभाजी राजे युवा प्रतिष्ठानचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांनीही विशेष सहकार्य केल्याची माहिती मिळाली आहे.

 

दरम्यान, मंगळवार दि. १० मार्च रोजी सकाळी करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत माने साहेब यांनी तसेच पूनवरचे तलाठी भाऊसाहेब यांनी या अश्वारूढ पुतळ्याची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यानंतर त्यांनी या संदर्भातील माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविली असून वरिष्ठ अधिकारी ही पुनवर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची पाहणी करणार असल्याचे समजले आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचा हा भव्य पुतळा उभारल्यामुळे गावातील तरुण पिढीला स्वराज्याच्या इतिहासाची प्रेरणा मिळणार असून गावाच्या ओळखीमध्येही भर पडणार आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये व शिवप्रेमीमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close