-->
करमाळासामाजिक

प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानने उभारली गुढीपाडव्यानिमित्त पुस्तकांची गुढी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुक्यातील रावगाव येथे प्रेरणा मानव विकास प्रतिष्ठानच्या वतीने गुढीपाडवा हा सण पुस्तकांची गुढी उभारून साजरा करण्यात आला. यावेळी रावगाव ग्रामपंचायतीच्या माजी ग्रा.पं . सदस्या श्रीमती अविदा (ताई) कांबळे यांच्या हस्ते परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास कांबळे बोलताना म्हणाले की, गुढीपाडवा हा सण आम्ही पुस्तकांची गुढी उभा करून साजरा करत आहोत. ज्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे पुस्तके माझा श्वास आहेत. त्या पद्धतीने माणसाला जीवनामध्ये उंची गाठायची असेल, यशस्वी व्हायचे असेल तर पुस्तकां शिवाय पर्याय नाही, म्हणून आम्ही पुस्तकांची गुढी उभारली आहे. या पुस्तकांच्या गुढीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, अहिल्यादेवी होळकर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, संत कबीर, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, संत रविदास आदी महापुरुषांच्या विचारांची वैचारीक मीमांसा करणारी ही पुस्तके आहेत.

यावेळी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश कांबळे, करमाळा तालुका उपाध्यक्ष राजू पवार, तालुका कार्यकारिणी सदस्य गणेश पवार, विजू पवार, प्रियंका कांबळे, शितल कांबळे, प्रेरणा कांबळे, प्रयाग कांबळे, संदीप पवार, पल्लवी पवार आदीसह मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close