-->
करमाळा

श्री. राजेश्वर विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला १ लाख ११ हजार रुपयांची देणगी

 

 

प्रतिनिधी/संजय साखरे

 

करमाळा तालुक्यातील राजुरी येथील श्री राजेश्वर विद्यालयास इयत्ता दहावीच्या १९८७ च्या बॅच तर्फे विद्यालयाच्या भौतिक सुविधेसाठी १,११,१११/- (एक लाख अकरा हजार एकशे अकरा) रुपयांची देणगी देण्यात आली. या कामी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि जेऊर येथील भारत महाविद्यालयामध्ये मराठी विभागाचे प्रमुख असलेले प्राध्यापक डॉक्टर संजय चौधरी व त्यांच्या वर्ग मित्रांनी पुढाकार घेतला. शाळेच्या विकासासाठी माजी विद्यार्थी या नात्याने या सर्व मान्यवरांनी उपस्थित राहून ही देणगी रक्कम विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अनिल झोळ सर यांच्याकडे सुपूर्द केली.

 

 

यावेळी प्राध्यापक संजय चौधरी यांनी शाळेच्या विकासासाठी ज्या ज्या वेळी गरज भासेल, त्यावेळी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

 

 

यावेळी प्राध्यापक चौधरी यांच्यासह सुरेश साखरे, हरिचंद्र लोखंडे, भारत टापरे, अशोक कचरे, आत्माराम जाधव, विठ्ठल देशमुख, रावसाहेब जाधव, कुंडलिक साखरे, विलास दुरंदे हे माजी विद्यार्थी उपस्थित होते. या सर्वांचा विद्यालयाच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close