-->
करमाळासामाजिक

नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये पालकांनी घेतला मुलांसोबत ‘या’ उपक्रमाचा आनंद

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा येथील श्री गिरधरदासजी देवी प्रतिष्ठान संचलित, नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स मध्ये पालकांनी आपल्या मुलासोबत ‘फॅमिली फोटो फ्रेम’ या उपक्रमाचा आनंद घेतला. शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी नवभारत इंग्लिश स्कूल मध्ये फॅमिली फोटो फ्रेम बनवणे बाबतचा हा उपक्रम नर्सरीतील मुलांसाठी घेण्यात आला होता.

 

मोठेपणी आपण आपले बालपण विसरलेलो असतो. तेच बालपण आपण आपल्या मुलांमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या आठवणींना उजाळा मिळाला म्हणून पालक वर्ग ही यावेळी खुश होता. तर आपल्या पालकांसोबत आपण उपक्रम करत आहोत म्हणून बालवर्गही खुश होता. याप्रसंगी अनेक पालकांनी आपल्या मुलांसोबत या उपक्रमात सहभाग नोंदवला.

 

यावेळी बनवलेल्या फोटो फ्रेम चे शाळेच्या संस्थापिका सौ. सुनिता देवी मॅडम व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुनीता मोहिते मॅडम यांनी कौतुक केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close