हवेली प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


लोणी काळभोर येथील पोलिस ठाण्यामध्ये आज दि. १ सप्टेंबर २०२१ रोजी महिला विश्रांती कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. चार ते पाच महिन्यापूर्वी लोणी काळभोर पोलीस ठाणे हे पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आले आहे. त्यावेळी लोणी काळभोर पोलीस स्टेशन येथील सुविधा अत्यल्प असल्याचे जाणवले त्यानुसार भारत पेट्रोलियम सी. एस. आर. फंडाच्या माध्यमातून येथे महिला पोलिसांसाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आला आहे.

त्यामुळे महिला पोलिसांची सोय होणार आहे. या पोलिस ठाण्याला महिला पोलीस आपल्या नोकरीसाठी लांबून येत असतात व अशातच कामाचा ताण येत असतो. त्यामुळे महिला पोलिसांना विश्रांती ग्रह उभारण्यात आले आहे. पुण्यातील इतर ठाण्यात उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. लवकरच हे पोलीस ठाणे देखील त्यातून पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. अशी माहिती यावेळी बोलताना आयुक्त गुप्ता यांनी दिली आहे.
यावेळी सहाय्यक आयुक्त रवींद्र शिसवे, अप्पर पोलीस आयुक्त नामदेव चव्हाण, परिमंडळ ५ चे पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, हडपसर विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणराव विधाते, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनचे मुख्य प्रबंधक राहुल सूर्यवंशी, लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, गुन्हे शाखेचे सुभाष काळे, पोलीस निरीक्षक सुनील जैतापूरकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर, श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस उपनिरीक्षक जयवंत हंचाटे, भागवत शेंडगे, अमृता काटे, दिगंबर बिडवे, प्रमोद हंबीर उपस्थित होते.
मोक्काच्या कारवाईबाबत कठोर गुन्ह्याचे अर्धशतक साजरे करणाऱ्या पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी बोलताना सांगितले की, आम्ही नंबर गेम मध्ये जात नाही व पन्नास करायचे की जास्त करायचे हा आमचा उद्देश कधीही नसतो. आमच्यासाठी गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो. अशा शब्दात अमिताभ गुप्ता यांनी बोलताना मोक्काच्या कारवाईबाबत सांगितले आहे.




