-->
करमाळाराजकिय

लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल पतसंस्थेचे अध्यक्षपदी गजेंद्र पोळ यांची बिनविरोध निवड

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

लोकनेते स्वर्गीय दिगंबररावजी बागल सहकारी नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी गजेंद्र पोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. करमाळा तालुक्यातील या पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक भारतीय जनता पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष रश्मीदीदी बागल व दिग्विजयभैया बागल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

 

या निवडणुकीत गजेंद्र पोळ, गोरख काकडे, जलाल पटेल, अमोल दौंडे, दत्तात्रय बारवकर, तात्या बागल, सारिका ठोसर, शैला भोसले, शरद जगताप, लक्ष्मण खोमणे, विकास भोसले यांची बिनविरोध संचालकपदी निवड झाली. त्यानंतर तालुका उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयात झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या बैठकीत गजेंद्र पोळ यांची अध्यक्ष (चेअरमन) पदावर, तर लक्ष्मण खोमणे यांची सचिवपदी निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उमेश बेंडारी यांनी काम पाहिले.

 

नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळाचा सन्मान माजी आमदार शामलताई बागल (मामीसाहेब) यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी मकाई कारखान्याचे चेअरमन दिनेश भांडवलकर, संचालक गणेश झोळ, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी कदम, सतीश अनपट, बबलू कांबळे, अनिल पवार, प्रवीण यादव, अनिल वायकर, मोहन यादव, सुरज काळे, गणेश अंधारे तसेच मकाई कारखान्याचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close