-->
करमाळाराज्यविशेषसामाजिक

करमाळ्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; विजयसिंह तळेकर ‘या’ पुरस्काराने राज्यपालांकडून सन्मानित

केम प्रतिनिधी: संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम गावचे सुपुत्र व सध्या पनवेल जि. रायगड येथे तहसिलदार पदावर कार्यरत असलेले विजयसिंह तळेकर यांना कोरोना काळातील उत्कृष्ट कामगिरी बद्दल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे हस्ते ‘कोविड संजिवनी’ हा पुस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा मुंबईतील राजभवनात पार पडला. यावेळी डाॅ. तात्या लहाने उपस्थित होते.

तळेकर यांनी कोरोना मुक्तीसाठी शासनाच्या धोरणानुसार योग्य ती अंमलबजावणी केली. तसेच त्यानी केम येथे मास्क व साॅनिटायझर वाटप केले होते. विजयसिंह तळेकर यांची गेल्या वर्षी ही सांगली येथे पूरग्रस्तांच्या नियोजनासाठी शासनाने अनुभवी प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती.

या वर्षी सुध्दा पूरग्रस्तांना मदत वाटण्यासाठी तहसिलदार विजयसिंह तळेकर यांच्या सहकार्याने केम येथील शिवशंभू भक्त परिवाराचे सागर राजे तळेकर, समीर तळेकर, सचिन जाधव, राजाभाऊ तळेकर, बालाजी आवताडे, उमेश पाडुळे, बबलू सुर्वे, विष्णूपंत तळेकर, पप्पू तळेकर यांना मदत केली आहे. ही मदत पोलादपूर तालुक्यातील सावित्री नदीच्या काठावरील सरर्ई गावात वाटप करण्यात आली. या गावात अदयाप पर्यत कसलीही मदत पोहचली नव्हती. त्यामुळे येथील पूरग्रस्तांनी केम येथील शिवशंभू भक्त परिवाराचे व तहसिलदार विजय तळेकर यांचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close