दहिगाव उपसा सिंचन योजना करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाला वरदान ठरणार- रवींद्र वळेकर

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


आमदार संजयमामा शिंदे यांच्या सूचनेनुसार दहिगाव उपसा सिंचन योजनेची आवर्तने नियमित सुरू असून त्यामुळे करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाचा कायापालट झाला आहे. दहीगाव उपसा सिंचन योजना ही आमच्या पूर्व भागाला वरदान ठरली आहे असे मत करमाळा तालुका राष्ट्रवादी पदवीधर चे तालुकाध्यक्ष रवींद्र वळेकर यांनी व्यक्त केले. निंभोरे येथील फुटतळे तलावाच्या पाणी पूजन प्रसंगी ते बोलत होते.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यकाळात आत्तापर्यंत चार वेळेस या तलावाचा सांडवा दहीगाव उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून निघाला असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार शिंदे यांच्या या कामामुळे फूटतळे व परिसरातील शेतकरी वर्ग सुखावला आहे. यावेळी सौ.प्रभावती वळेकर, सौ. शोभा वळेकर, सौ. सुमन दळवी, सौ. सारिका वळेकर, सौ. रामकवर दळवी, जयश्री दळवी, मंगल दळवी, शितल दळवी, पारुबाई वळेकर, पूनम वळेकर यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले.
दहिगाव उपसा सिंचन योजनेचे आवर्तन सुरळीतपणे पार पाडण्या कामी योगदान दिल्याबद्दल दहिगाव योजनेचे शाखा अभियंता सोहम कांबळे साहेब आणि चालक अमोल कोकणे, राष्ट्रवादी पदवीधर चे करमाळा तालुका अध्यक्ष राविदादा वळेकर यांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी शुभाष वळेकर, तुळशीराम वळेकर, राजेंद्र वळेकर, सोमनाथ वळेकर, बाळू फरतडे, किसन वळेकर, अशोक वळेकर, हरिभाऊ वळेकर, लिंबाजी वळेकर, भैरू वळेकर, संतोष वळेकर, ज्ञानदेव वळेकर, आदित्य वळेकर, विठ्ठल वरकड (सर), अभिमान दळवी, विकास दळवी, रमेश दळवी, ज्ञानेश्वर वळेकर, गणेश वळेकर आदि ग्रामस्थ उपस्थित होते.
निंभोरे गावाच्या चारही बाजूने चार तलाव आहेत. त्यापैकी चालू आवर्तनाला विठोबा तळे, आंब्याचा मळा येथील तळे आणि फूट तळे भरून सांडवा निघाला आहे. तसेच एकवीरा आई चे तळे हे १० नंबर चारीवर येत असून या चारीचे काम पूर्ण करून ते ही भरण्याचा आमचा मानस आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या सहकार्याने या अडीच वर्षात आत्ता पर्यंत विठोबा तळे ३ वेळा, फूट तळे ४ वेळा तर फरतडे येथील वस्ती वरील तळ्याचा २ वेळा सांडवा निघाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून सर्वजण समाधान व्यक्त करत आहेत. यापुढे देखील अशीच योजना चालवली जाईल व शेतकरी बांधवांचे हित साधण्यासाठी आम्ही कटी बद्ध आहोत.
रविंद्र वळेकर (निंभोरे)




