-->
करमाळामनोरंजन

राशीन पेठ तरूण सेवा मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

करमाळ्याचा राजा म्हणून प्रसिद्ध असणारे राशीन पेठ तरूण सेवा मंडळ करमाळा यांच्या वतीने पारंपरिक गणेशोत्सव यावर्षी उत्साहात साजरा केला जाणार आहे. गेली दोन वर्षे लॉकडाऊन असल्यामुळे कोणतेच सण, उत्सव साजरे केले गेले नाहीत. त्यामुळे या वर्षी गणेशोत्सव उत्साहात व जोरदार पद्धतीने साजरा होणार आहे. अशी माहीत राशीन पेठ तरूण सेवा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

यामध्ये लहान मुलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आणि महिलांना रोजच्या कामाच्या धावपळीतून मनोरंजन म्हणून विविध स्पर्धा व कार्यक्रम राशीन पेठ तरूण सेवा मंडळाने आयोजित केले आहेत. तसेच अथर्वशीर्ष पठण, कीर्तन व प्रवचन आयोजित करून भक्तिमयपणे गणेशोत्सव साजरा होणार आहे.

खालीलप्रमाणे होणार रोजचे कार्यक्रम

▪️बुधवार दि. ३१/०८/२०२२ रोजी सायं. ०६:०० वाजता श्रींची मिरवणूक व रात्री ०८:०० वाजता प्राणप्रतिष्ठा

▪️गुरुवार दि. ०१/०९/२०२२ रोजी सायं ०५:०० वाजता वक्तृत्व स्पर्धा तसेच सायं ०६:०० वाजता सुलेखन स्पर्धा

▪️शुक्रवार दि. ०२/०९/२०२२ रोजी सायं ०५:०० वाजता लहान मुलांची सांस्कृतीक वेशभुषा स्पर्धा व सायं ०६:०० वाजता संगीत खुर्ची स्पर्धा (बाल वर्ग)

▪️शनिवार दि. ०३/०९/२०२२ रोजी सायं ०५:०० प्रश्नमंजुषा स्पर्धा (मुले/मुली)

▪️रविवार दि. ०४/०९/२०२२ रोजी सायं ०५:०० वाजेच्या पुढे गौरी आरास स्पर्धा

▪️सोमवार दि. ०५/०९/२०२२ रोजी सायं ०६:०० वाजता प्रश्नमंजुषा स्पर्धा (महिला गट)

▪️मंगळवार दि. ०६/०९/२०२२ रोजी सकाळी ११:०० वाजता अथर्वशीर्ष पठण तसेच सायं ०५:०० वाजता मोदक स्पर्धा

▪️बुधवार दि. ०७/०९/२०२२ रोजी सायं ०६:०० वाजता करीअर मार्गदर्शन व सायं ०७:०० वाजता बक्षिस वितरण समारंभ

▪️गुरुवार दि. ०८/०९/२०२२ रोजी सायं ०६:०० वाजता गणपती आरास व प्रसाद वाटप

▪️शुक्रवार दि. ०९/०९/२०२२ रोजी दुपारी ०४:०० वाजता गणपती विसर्जन भव्य मिरवणूक

 

त्याचप्रमाणे दररोज सकाळी १० वाजता व रात्री ८ वाजता गणपतीची आरती होणार असून वरीलप्रमाणे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धा राशीन पेठ तरूण सेवा मंडळातील लहान मुले आणि महिलांसाठी राहतील.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close