हवेली प्रतिनिधी


पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र थेऊर येथे अष्टविनायक गणपतीच्या मंदिरांपैकी पाचवा असलेल्या गणपतीचे श्री चिंतामणी मंदिर आहे. गेल्या दोन वर्षा पासुन कोरोणा काळात राज्यातील सर्व मंदिरे बंद होती. राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी घट स्थापनेच्या मुहुर्तावर राज्यांतील सर्व मंदिर खुली करण्याचे आदेश दिले आहेत. राज्यांतील सर्व मंदिरे कोरोणाचे सर्व नियम पाळुन भाविकांसाठी खुले करण्यात आली आहे.
थेऊर येथील श्री क्षेत्र चितामणी येथे महाराष्ट्रासह इतर राज्यातुन ही असंख्य भाविक अष्टविनायक यात्रा दर्शनसाठी येत असतात. थेऊर गावाला ऐतिहासिक वारसा लाभलेला असून मुळा मुठा नदीच्या तीरी सती रमाबाई पेशवे यांचे स्मारक आहे. येथे ही भाविकांची मोठ्या संख्येने ये जा असते.
थेऊर येथे पेशवे कालीन वाडा आहे. या ठीकाणी थेऊर ग्रामपंचायतीच्या माध्यमातून वाहन तळ चालु केले आहे आणि भाविकाच्या वाहनांकडून पार्किग ची वसुली केली जाते. वाहन तळामध्ये दोन शौचालय असून त्यांचे अष्टविनायक सुविधा प्रकल्प मुंबई यांच्या माध्यमातुन २१-०८-१९९२ रोजी लोकार्पण झाले होते. पण पाण्याअभावी दोन्ही शौचालय बंद पडलेल्या अवस्थेत असल्या कारणाने भाविकांना विशेषता महिला वर्गासाठी लघुशंकेला जाण्यासाठी अनेक अडचणीनां सामोरे जावे लागत आहे. नाईलाजास्तव उघड्यावर शौचाला (लघुशंकेसाठी) जावे लागत असून ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे.
दर्शनासाठी आलेल्या भाविकांकडुन थेऊर ग्रामपंचायत आणि चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या माध्यमातून लवकरात लवकर शौचालयाची सोय व्हावी अशी आशा व्यक्त केली जात आहे.




