-->
करमाळाराजकिय

नेरले येथील वडार समाजाचा आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

करमाळा तालुक्यातील नेरले या गावातील येथील वडार समाजातील सुमारे २० कार्यकर्त्यांनी आमदार संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. नेरले चे सरपंच समाधान दौंड यांच्या उपस्थितीत आ. संजयमामा शिंदे यांच्या निमगांव (टें) येथील निवासस्थानी नेरले गावातील वडार समाजाच्या कार्यकर्त्यांनी बागल गटातून आमदार शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी सर्व कार्यकर्त्यांचा आमदार संजयमामा शिंदे यांनी फेटा बांधून सत्कार केला.

नेरले येथील वडार समाजाचे माजी सरपंच यलप्‍पा काळे, पंडित काळे, माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब काळे, माणिक काळे, मोहन काळे, बाबुराव काळे, हनुमंत काळे, बबन काळे, हंबीरराव काळे, दत्तात्रय काळे, सिताराम काळे, रावसाहेब काळे, पंडित काळे, नितीन काळे या कार्यकर्त्यांनी आ. संजयमामा शिंदे यांच्या गटात प्रवेश केला.

यावेळी नेरले चे सरपंच समाधान दौंड, उपसरपंच शरद काळे, कन्हेरगांवचे माजी उपसरपंच धनंजय मोरे, प्रवीण शिंदे गुरुजी, माजी सरपंच अंकुश हंडाळ, सागर काळे, ग्रामपंचायत सदस्य शरद काळे, मेजर विष्णू काळे सर, युवराज महाडिक, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी भरगंडे, राजेंद्र केदार, दशरथ चव्हाण आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close