
प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


फुलगाव, ता. हवेली ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदी नुकतीच ज्योती सोमनाथ गवारे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विद्यमान उपसरपंच योगेश कोळपकर यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी ग्रामपंचायत कार्यालयात विद्यमान सरपंच मंदानानी साकोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. यावेळी ज्योती गवारे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक डी. के. पवार यांनी ज्योती सोमनाथ गवारे यांची उपसरपंच पदी निवड झाली असल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र खुळे, राहुल वागस्कर, योगेश कोलपकर, नयना खुळे, उज्वला खुळे, निर्मला वागस्कर, संध्या शिनगारे, विशाल वंजारी उपस्थित होते.
ज्योती गवारे यांची उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल भंडाऱ्याची उधळण करत त्यांचा फुलगाव ग्रामस्थांचे वतीने जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना ज्योती गवारे यांनी गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी शासनाच्या वतीने जाहिर होणारे विविध उपक्रम गावात राबविण्यात येणार असुन भविष्यात महिला बचत गटांना रोजगार, सुशिक्षित स्थानिक भूमी पुत्रांना रोजगार तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारच्या कार्यशाळा घेणार असल्याचे यावेळी ज्योती गवारे यांनी आपल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले.
यावेळी नारायण खुळे, नामदेव वागस्कर, भानुदास साकोरे, जयवंत खुळे, सोमनाथ खुळे, कांताराम वागस्कर, अशोक वागस्कर, किरण साकोरे, वामन खुळे, भाऊसाहेब खुळे, दादाभाऊ खुळे, राजाराम साकोरे, आप्पा साकोरे, सुदाम वागस्कर, पोलीस पाटील योगिता साकोरे, सुशीला वागस्कर, शारदा वागस्कर, विलास खुळे, मारुती खुळे, सागर गवारे, शांताराम साकोरे, अशोक साकोरे, संतोष साकोरे, किरण खुळे, सागर खुळे, कपिल वागस्कर, संभाजी वागस्कर, नवनाथ वागस्कर, प्रवीण शिनगारे, भानुदास वागस्कर, आण्णा वागस्कर, आदिनाथ साकोरे, भिमाजी खुळे, सोपान गवारे, पंडित गवारे, पोपट खुळे, कांतीलाल साकोरे, दिलीप वागस्कर, नामदेव गजाबा वागस्कर, संजय शिनगारे, नवनाथ गवारे, रंगनाथ गवारे, नामदेव खुळे, मारुती वागस्कर, अर्जुन गवारे, प्रेमनाथ गवारे, शंकर वागस्कर, चंद्रकांत साकोरे, पांडू वागस्कर, दीपक वागस्कर, रुपेश वागस्कर आदी यावेळी उपस्थित होते.




