केम प्रतिनिधी/संजय जाधव


केम येथील सेवानिवृत्त सैनिक सोमनाथ भारत गरदडे यांनी सीमा सुरक्षा दल BSF मध्ये आपल्या देशाची सेवा करून सीमेचे रक्षण केले. ते आता सेवेतून निवृत्त झाले आहेत. त्यानिमित्त त्यांचा केम ग्रामस्थ आणि धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ, केम यांच्या वतीने प्रहार संघटनेचे करमाळा तालुका अध्यक्ष संदिप तळेकर यांच्या हस्ते सहकुटुंब सत्कार करण्यात आला.
यानंतर धर्मवीर संभाजीराजे मित्र मंडळ केमचे अध्यक्ष उमेश पाडूळे, उपाध्यक्ष रोहित तळेकर, कार्याध्यक्ष ओंकार जाधव व सर्व पदाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव साहेब, माजी सरपंच अजित तळेकर, महावीर आबा तळेकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष सागरराजे दोंड, उपाध्यक्ष सागर तळेकर, उपसरपंच नागन्नाथ तळेकर गुरूजी, समीर तळेकर, बापु नेते तळेकर, आजिनाथ जाधव गुरूजी, सचिन जाधव, दत्ता तळेकर यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर आणि ग्रामस्थ यांनी सोमनाथ गरदडे मेजर यांचा सन्मान करून भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना सेवानिवृत्त सैनिक सोमनाथ गरदडे म्हणाले की, तीस वर्षे देशाची सेवा करावयास मिळाली. हे मी माझे भाग्य समजतो. या पुढेही समाजसेवा करणार आहे. माझ्या या तीस वर्षांच्या सेवेमध्ये माझ्या कुटुंबाचा त्याग तितकाच महत्त्वाचा आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जोतिराम तळेकर गुरूजी यांनी केले. उपसरपंच नागन्नाथ तळेकर गुरूजी यांनी आभार मानले. तर कार्यक्रमाचे आयोजन संदिप तळेकर, पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव साहेब व धर्मवीर संभाजी राजे मित्र मंडळ केम यांनी केले.




