
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


भारतीय जनता पार्टी करमाळा तालुक्याच्या वतीने आज रविवार दि. २५ डिसेंबर रोजी करमाळा येथील भाजपच्या संपर्क कार्यालयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. तसेच देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांचा ‘मन की बात’ कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता.
यावेळी भाजपाचे करमाळा तालुका अध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका उपाध्यक्ष रामभाऊ ढाणे, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस अमोल पवार, सुहास माने, भरत गुंड, बापूसाहेब तांबे ,काशिनाथ होगले, लक्ष्मण काळे, वसिम सय्यद, संतोष कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




