-->
करमाळाकृषी विषयकमहिलाविषयक

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा; जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे यांचे आवाहन

सावडी येथे कृषी विभागाच्या वतीने आयोजित महिला मेळावा संपन्न

 

करमाळा/प्रतिनिधी

 

करमाळा कृषी विभागाच्या वतीने शनिवार (दि. २२ जुलै) रोजी सावडी (ता. करमाळा) येथे प्रधान मंत्री फसल बीमा योजना २०२४ व प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना तसेच कृषी उद्योग विषयक विविध शासकीय योजनांच्या माहिती संदर्भात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

 

या प्रसंगी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे यांनी विविध प्रकारच्या प्रक्रिया उद्योग या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यामधे त्यांनी करमाळा तालुक्यात आत्तापर्यंत झालेल्या प्रकिया उद्योगाची माहिती दिली. तसेच या योजनेत जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले.

 

यावेळी कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव यांनी एक रुपयात प्रधान मंत्री फसल बीमा योजनेमध्ये विमा कसा भरावा. या विषयी मार्गदर्शन केले व प्रतिनिधिक स्वरूपात एक अर्ज प्रत्यक्ष भरुन दाखवला. खरीप हंगामामध्ये कडधान्य पिकामध्ये तूर, मूग, उडीद, गळीत धान्य मध्ये सूर्यफूल, तृणधान्ये मध्ये बाजरी, मका, भाजीपाला पिकांत कांदा या पिकांचा समावेश असतो असे सांगितले. प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना आणि आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ निमित्ताने पौष्टीक तृणधान्ये लागवड तंत्रज्ञान व त्यांचे आहारातील महत्त्व उपस्थित महिला शेतकरी यांना सागितले.

 

यावेळी कृषी पर्यवेक्षक उमाकांत जाधव साहेब, महेश काळे, सरपंच सौ. शशिकला शेळके, कृषी सहाय्यक हरि दळवी, आसिफ तांबोळी, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेचे जिल्हा संसाधन व्यक्ती मनोज बोबडे व मंगेश भांडवलकर तसेच सावडी गावातील महिला शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार आसिफ तांबोळी यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close