
करमाळा/प्रतिनिधी


अधिक श्रावणमासाचे औचित्य साधत करमाळा शहरातील सोहम महिला मंडळ आणि राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने शुक्रवार दि. २८ जुलै २०२३ ते गुरुवार दि. ३ ऑगस्ट २०२३ या कालावधीत श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे.
भागवताचार्य श्री कौस्तुभजी (रामदासी) महाराज (श्री संत वेणा स्वामी मठ, मिरज) यांच्या सुमधुर वाणीत दुपारी २ ते सायं. ५ या वेळेत करमाळा शहरातील दत्त पेठ येथील गुरुप्रसाद मंगल कार्यालयात हा धार्मिक कार्यक्रम होणार आहे.
तरी करमाळा शहर व परिसरातील सर्व भाविक- भक्तांनी कथा श्रवणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन सोहम महिला मंडळ आणि राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.




