Burning ट्रेन चा थरारक VIDEO; चालत्या ट्रेनने घेतला पेट

माय मराठी न्युज नेटवर्क


चालत्या ट्रेनने अचानक पेट घेतल्यामुळे एसी च्या दोन बोगी जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील मुरैना जिल्ह्यात घडली आहे. ट्रेनच्या डब्यातून अचानक धूर येऊ लागला आणि पाहता पाहता चार डबे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. मुरैना जिल्ह्यातील हेतमपूर रेल्वे स्टेशन परिसरात ही ट्रेन आली असता आग लागल्याचे निदर्शनास आले.
व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा👇🏻👇🏻👇🏻👇🏻
पंजाब उधमपूर बुरुजावरून छत्तीसगडला येणा-या गाडी क्रमांक २०८४८ या दुर्ग-उधमपूर एक्सप्रेस ट्रेनच्या बोगीत आग लागल्याने खळबळ उडाली आहे. अगोदर एसी बोगीत आग लागली आणि त्यानंतर त्याच्या ज्वाळा इतर बोगींमध्ये पसरल्या होत्या. यावेळी ट्रेनचा वेग जास्त असल्याने एसी डब्याची आग ट्रेनच्या इतर बोगीपर्यंत पोहोचू लागली. प्रवाशांनी साखळी ओढून ट्रेन थांबवली. त्यानंतर ट्रेन मध्ये आग लागल्याचे समजताच लोको पायलटने ट्रेन मुरेनाजवळ हेतमपूर रेल्वे स्थानकावर थांबवली. यानंतर सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. फॉरेन्सिक तपासणीनंतर या कारणांचा खुलासा होऊ शकेल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
यात कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नसून सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. स्टेशन मास्तरांनी तत्काळ अग्निशमन दल आणि रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. रेल्वेचे तांत्रिक पथकही घटनास्थळी पोहोचले होते.




