-->
करमाळाराजकिय

राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 

प्रतिनिधी/संजय साखरे

 

करमाळा तालुक्यातील राजुरी येथील सामाजिक कार्यकर्ते व आमदार संजय मामा शिंदे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्री. नंदकुमार जगताप यांचा वाढदिवस आज दि.१२ मे रोजी राजुरी ता. करमाळा येथे त्यांचा सत्कार करून व केक कापून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

आमदार संजय मामा शिंदे गटाचा एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. राजुरी येथील सब स्टेशनचा प्रश्न मार्गी लावण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. आ. शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून त्यांनी राजुरी साठी स्वतंत्र वीज उपकेंद्राची मागणी केली होती. त्याला यश आले असून लवकरच या उपकेंद्राला मंजुरी मिळणार आहे. त्याचबरोबर राजुरी येथील रस्त्याच्या चढाची उंची कमी करून तो समान पातळीवर आणून वाहतुकीच्या दृष्टीने सोयीचा करण्यासाठी त्यांनी आ. संजय मामा शिंदे यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार त्या रस्त्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून लवकरच हे काम सुरू होईल.

 

यावेळी झालेल्या सत्काराला उत्तर देताना त्यांनी सांगितले की, मला कोणत्याही पदाची अपेक्षा नसून भविष्यामध्ये समाजोपयोगी कामे करण्यावर आपला भर राहील. आपले उर्वरित आयुष्य समाज सेवेसाठी खर्च करण्याचा मनोदय यावेळी त्यांनी व्यक्त केला. या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना त्यांचे नातेवाईक, गावातील नागरिक, मित्र परिवार, पंचक्रोशीतील त्यांच्याशी ऋणानुबंध असणारे मित्रमंडळी या सर्वांनी दिलेल्या आशीर्वाद याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले.

 

यावेळी सरपंच डॉ. अमोल दुरंदे, युवक नेते आर. आर. बापू साखरे, नवनाथ दुरंदे, उदय साखरे, नितीन साखरे, आप्पासाहेब साखरे, शशिकांत दुरंदे, महादेव साखरे, एकनाथ शिंदे, कल्याण दुरंदे, जालिंदर पाटील, हनुमंत जगताप, राजेंद्र भोसले, बंडू टापरे, बापू साखरे, माऊली चिंचकर, आकाश झोळ, आप्पा अवघडे, नागेश मोरे, डॉ. पापा मणेरी आदि ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close