
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


७५ व्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त करमाळा तालुक्यातील गौंडरे येथील धर्मवीर संभाजी विद्यालयात सोमवार दि. १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन विविध उपक्रम राबवून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. यामध्ये निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, जनरल नॉलेज परीक्षा, चित्रकला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा असे विविध कार्यक्रम राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमाला परिसरातील आजी-माजी सैनिकांना आमंत्रित करून त्यांचा आदर सत्कार करून सन्मान करण्यात आला. यावेळी गौंडरे येथील शिवनाद सांस्कृतिक कला मंच चे संस्थापक विजयजी खंडागळे यांच्या ग्रुपकडुन प्रत्येक वर्गातील एका (आर्थिक परिस्थितीने अतिशय गरिब असणारा) विद्यार्थ्याला दत्तक घेऊन त्यांचा वार्षिक सर्व खर्च ग्रुपने उचलला आहे. यावेळी दत्तकृपा कंट्रक्शन चे मालक भरत भाऊ अवताडे व करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती शेखर तात्या गाडे, माजी सैनिक राष्ट्रपती पुरस्कार विजेते तुकाराम चव्हान तसेच परिसरातील जवळजवळ २५ आजी माजी सैनिक यांच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गाण्यावर नृत्य व गायन करून हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेचे सचिव हरिदास काळे यांनी केले तर संस्थेचे अध्यक्ष, मुख्याध्यापक बापू निळ सर व उत्तम हनपुडे सर यांनी सत्कार केला. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन गिलबिले सर यांनी केले.
यावेळी संगीत विशारद विजय खंडागळे, सर्पमित्र माधव हनपुडे, गौंडरे गावचे सरपंच सुभाष पाटील, चंद्रकात नाना अंबारे, माजी सरपंच अजिनाथ सपकाळ, वसंत अंबारे, अण्णा सपकाळ यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




