-->
राजकियराज्य

खा. धैर्यशील व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकडून मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस

 

अकलूज/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी अंतरवाली-सराटी (जि.जालना) येथे महाराष्ट्रातील सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या न्याय मागणीसाठी आमरण उपोषणास बसलेल्या मनोज जंरागे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस करत त्यांच्या न्याय मागणीस व सकल मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा दर्शवला. तसेच सकल मराठा समाजाची न्याय मागणी लक्षात घेऊन आरक्षणाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यात यावा म्हणून महाराष्ट्र सरकारकडे मागणी करणार असल्याचे सांगितले.

 

जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी या गावात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरु आहे. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस असून त्यांची प्रकृती खालावली आहे. अशातच कोर्टाच्या निर्देशानुसार आपण उपचार घेत असून सलाईन लाऊन उपोषण करणे योग्य नाही, असे म्हणत आज संध्याकाळी पाच वाजल्यापासून उपोषण स्थगित करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केले.

 

दरम्यान आज दुपारी दोनच्या सुमारास खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन तब्येतीची काळजी घेऊन उपचार घेण्याबाबत विनंती केली. मराठा समाजाच्या न्याय मागण्या शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले.

 

यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील व शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत कोर्टाच्या निर्देशानुसार आपण आज उपोषण मागे घेत असून सर्वांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close