-->
करमाळाराजकियसामाजिक

संजय गुटाळ यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी प्रशासकीय संचालक व पांगरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय (भाऊ) गुटाळ यांच्या ४४ व्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी प्रतिष्ठान व संजय गुटाळ मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.

 

करमाळा तालुक्यातील पांगरे, भाळवणी, कविटगाव, वांगी क्र.३ आणि गुटाळ वस्ती येथील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना एकूण १,००० वह्या, १,००० पेन्सिली, तसेच शार्पनर आणि खोडरबर वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आवश्यक शालेय साहित्याची मोठी मदत झाली.

 

या कार्यक्रमास संदीप कांबळे, भारत आबा टेकाळे, प्रदीप टेकाळे, युवराज रोकडे, पप्पू गुटाळ, गहिनीनाथ गुंजाळ, अनिल गुटाळ, दिगंबर गुटाळ, चंद्रकांत पारेकर, रामेश्वर पारेकर, धनंजय तळेकर, किरण माळी, जय चोपडे, गणेश वाघमारे, स्वप्निल पारेकर, राहुल गुटाळ तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

 

या शालेय साहित्य वितरणामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागेल, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close