-->
करमाळाकृषी विषयक

बारामती ॲग्रो ऊस दराच्या बाबतीत कधीच कमी पडणार नाही- सुभाष (आबा) गुळवे

 

करमाळा/प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

कारखाना सुरू झाल्यापासून बारामती ॲग्रो कारखान्यांने कधीही ऊस उत्पादक, वाहतूकदार किंवा कर्मचाऱ्यांचे पैसे थकवले नाहीत. तसेच भविष्यातही ऊस दराच्या बाबतीत आम्ही कधीच कमी पडणार नाही, असे आश्वासन बारामती ॲग्रोचे व्हाइस चेअरमन सुभाष (आबा) गुळवे यांनी दिले. ते शुक्रवार दि. १२ सप्टेंबर रोजी करमाळा गट कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.

 

या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भरत (भाऊ) आवताडे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, सुजीत (तात्या) बागल यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मागील गाळप हंगामात (२०२४-२५) बारामती ॲग्रो कारखान्याने १६.९० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप केले होते; तर यंदाच्या गाळप हंगामासाठी २५ लाख मेट्रिक टन ऊसाच्या गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

यावेळी बोरगावचे सरपंच विनय ननवरे, प्रगतशील बागायतदार दादासाहेब सरडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक तालुकाध्यक्ष केशव चोपडे, अशपाक जमादार, अर्जुननगरचे सरपंच अनिल थोरात, प्रवीण भोगे, दादासाहेब देवकाते तसेच बारामती ॲग्रोचे असिस्टंट जनरल मॅनेजर हरिदास बनगर साहेब, हळगाव युनिट ३ चे केन मॅनेजर मधुकर मोहिते साहेब, युनिट-१ चे केन मॅनेजर दत्तात्रय कवडेसाहेब, डेप्युटी केन मॅनेजर हरिभाऊ गुळवे साहेब, ऊस वाहतूकदार, ऊस उत्पादक शेतकरी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निंबोरे साहेब यांनी केले तर आभार प्रवीण जाधव साहेब यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close