-->
करमाळाराजकिय

शहरातील रस्त्यांसाठी १८ कोटींचा प्रस्ताव; नगराध्यक्ष जगतापांच्या पाठपुराव्याला यश

 

प्रतिनिधी | करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा शहरातील रस्त्यांची झालेली दुरावस्था दूर करण्यासाठी तब्बल १८ कोटी रुपयांची मागणी नगरपालिके कडून करण्यात आला होती. नगराध्यक्ष वैभवराजे जयवंतराव जगताप यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा प्रस्ताव मंजुरीसाठी पुढे गेला आहे.

 

गेल्या दहा वर्षांत निधीअभावी अनेक रस्त्यांची कामे प्रलंबित राहिली होती. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष जगताप यांनी मुंबई मंत्रालयात उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी तत्काळ कारवाई करण्याचे आदेश देत, नगरविकास विभागाचे सचिव श्री. सहस्त्रबुद्धे यांना दूरध्वनीवरूनच निर्णय प्रक्रियेची गती वाढविण्याच्या सूचना दिल्या.

 

या भेटीत शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, उद्योजक बाळासाहेब बलदोटा यांनीही आरोग्यमंत्री आबिटकर, उद्योगमंत्री उदय सामंत, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व शिवसेना सचिव संजय मोरे यांचीही गाठीभेट घेऊन शहर व तालुक्यातील विविध मागण्यांची निवेदने दिली.

 

करमाळा शहर व तालुक्यातील सर्व निवडणुका धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढवणार असून त्या विजयी करण्याचा शब्द मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत शिवसेना मजबूत करण्यासाठी माझे सर्व कार्यकर्ते झटतील,” अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष वैभवराजे जगताप यांनी या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close