-->
करमाळासामाजिक

करंजे येथील मराठा समाजाची बैठक संपन्न; २९ ऑगस्ट ला मुंबई गाठण्याचा संकल्प

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

संघर्ष योद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या दि. २९ ऑगस्ट रोजी मुंबई येथे होणाऱ्या आंदोलनाला बळकटी मिळावी तसेच मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, या हेतूने करंजे (ता. करमाळा) गावातील मराठा समाज बांधवांनी आज रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९:३० वाजता मारुती मंदिरासमोर एकत्र येऊन आपल्या सामाजिक हक्क व आरक्षणासाठी कॉर्नर बैठक घेतली.

 

या बैठकीत मुंबई येथे होणाऱ्या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ९ वाजता करंजे येथून निघण्यासाठी एका आयसर टेम्पोचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी उपस्थित मराठा बांधवांनी वर्गणी करून स्वखर्चाने मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे.

 

बैठकीच्या शेवटी सर्व मराठा समाज बांधवांनी मोठ्या संख्येने मुंबई येथील आंदोलनाला उपस्थित राहून समाजाच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघर्ष योद्धा मनोज (दादा) जरांगे पाटील यांच्या लढ्याला साथ देण्याचे आवाहन करण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close