-->
करमाळाराजकिय

आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेनेच्या वतीने कमला भवानी मंदिरात महाआरती

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा तालुका युवासेनेच्या वतीने आठवडाभर विविध सामाजिक उपक्रम राबवून भगवा सप्ताह अभियान राबविण्यात येत आहे. आज शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख आशाताई टोनपे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे, संजय शिंदे, शहर प्रमुख प्रविण कटारीया, युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, जिल्हा समन्वयक सागर तळेकर, उपशहरप्रमुख पंकज परदेशी, संतोष गानबोटे यांच्या हस्ते देवीचामाळ येथील श्री. कमलाभवानी मंदिरात महाआरती करून या अभियानास सुरूवात करण्यात आली.

 

यावेळी महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षाताई चव्हाण, युवतीसेना तालुकाप्रमुख वैष्णवी साखरे, युवासेना शहर प्रमुख समिर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, बालाजी वाडेकर, भाऊ मस्तूद, मयुर यादव, विशाल नवगन, ज्ञानदेव लोंढे, शहाजीराव धेंडे उपस्थित होते.

 

यावेळेस भगवा सप्ताह अभियान बाबत माहिती देताना युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी सांगितले की, दि. १६ जुन रोजी हिवरे येथे जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थांना शालेय साहित्य व खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. तर दि. १७ जुन रोजी मिरगव्हाण येथील लावंड वस्ती शाळेवर शालेय साहित्य व खाऊ वाटप, तसेच १८ जुन रोजी हिंदुह्रदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन पोलीस निरिक्षक रणजित माने यांच्या हस्ते होणार आहे. दि. १९ जुन रोजी मातोश्री अनाथ आश्रम येथे अन्नदान करण्यात येणार असून दि. २१ जुन रोजी निमगाव जिल्हापरिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ व शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे.

 

दि. २६ जुन रोजी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूराव फरतडे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळा येथील सरकारी हाॅस्पिटल समोरील दत्त मंदिर येथे दहावी, बारावी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शिवसैनिकांचा मेळावा आयोजित केला आहे. या सर्व कार्यक्रमास सर्व शिवसैनिक, युवासैनिक व पदाधिकाऱ्यांनी आवर्जून उपस्थित रहावे. असे आवाहन युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close