-->
करमाळाविशेष

भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने जेऊरमध्ये १० जुलैला स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्याचा सत्कार

 

करमाळा/प्रतिनिधी

 

जेऊर (ता. करमाळा) येथे सोमवार (दि.१० जुलै) रोजी विविध स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. अजित पाटील साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जून सरक यांनी दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की, केंद्रीय लोकसेवा आयोग व महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेत उत्तुंग यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे डि वाय एस पी श्री अजित पाटील (केंद्रीय गृहमंत्री पदक विजेते पोलिस अधिकारी) यांच्या हस्ते करमाळा तालुक्यातील सर्व यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहेत.

 

या प्रसंगी आय ए एस अधिकारी शुभांगी पोटे (शेलगाव-वांगी), आय एफ एस अधिकारी तुषार शिंदे (कंदर), पी एस आय अमित लबडे (शेटफळ), पी एस आय निखील सरडे (चिखलठाण), पी एस आय सागर पवार (सरफडोह), पी एस आय श्रीकांत गोडगे (पुर्व सोगाव), पी एस आय ओंकार धेंडे (जिंती), पी एस आय दत्तात्रय मिसाळ (कोर्टी), पी एस आय अभिजित ढेरे (वीट), पी एस आय सोनाली हनपुडे (गौंडरे), पी एस आय विद्या कळसे (गुळसडी), पी एस आय पल्लवी मारकड (उमरड) या यशवंत विद्यार्थ्यांचे सत्कार होणार आहेत. हा कार्यक्रम उद्या सोमवार दि. १० जूलै रोजी भारत महाविद्यालयाच्या सभागृहात दुपारी दोन वाजता संपन्न होणार असून या कार्यक्रमाला आजी माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, कारखाना संचालक, शैक्षणिक संस्था पदाधिकारी तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी, शिक्षक, प्राध्यापक आदिंना विशेष निमंत्रण दिले आहे.

 

या कार्यक्रमाचे आयोजन भारत शिक्षण प्रसारक मंडळाच्या भारत महाविद्यालय तसेच माजी आमदार नारायण (आबा) पाटील कला क्रिडा व सांस्कृतिक मंडळाच्या संयुक्त विद्यमाने केले गेले आहे. सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी तसेच सुजाण नागरिक बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे. असे आवाहन सचिव प्रा. अर्जून सरक यांनी केले. यावेळी भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष अनिलकुमार गादिया, भारत महाविद्यालय प्राचार्य डाॅ अनंतराव शिंगाडे, भारत हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज प्राचार्य केशव दहिभाते, मा. आ. नारायण (आबा) पाटील मित्रमंडळाचे तालुकाध्यक्ष प्रा. डाॅ. संजय चौधरी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

One Comment

  1. Купить одежду для детей – только в нашем интернет-магазине вы найдете широкий ассортимент. Быстрей всего сделать заказ на одежда детская интернет магазин можно только у нас!
    [url=https://barakhlysh.ru/]одежда для детей[/url]
    детский трикотаж – [url=http://www.barakhlysh.ru/]https://barakhlysh.ru[/url]
    [url=http://www.google.dj/url?q=http://barakhlysh.ru]https://vn.com.ua/ua/go?http://barakhlysh.ru[/url%5D

    [url=https://www.lowcarbcomfort.com/2017/07/supreme-pizza-cauliflower-casserole/#comment-40258]Трикотаж детский – предлагаем широкий выбор стильной и качественной одежды для детей всех возрастов, от младенцев до подростков.[/url] 831028c

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close