आदिनाथ कारखान्याची निवडणूक जाहीर; इच्छुकांनी बागल संपर्क कार्यालयातून नामनिर्देशन पत्र भरावेत- दिग्विजय बागल

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक सध्या जाहीर झाली असून, इच्छुक बागल गटाच्या कार्यकर्त्यांनी करमाळा येथील बागल संपर्क कार्यालयातून आपले नामनिर्देशन पत्र (निवडणूक फॉर्म) भरून सादर करावेत. असे आवाहन मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन व शिवसेना युवा नेते दिग्विजय बागल यांनी आज केले.
याबाबत अधिक बोलताना ते म्हणाले की, श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक लागली असून आदिनाथ कारखाना गेल्या वीस वर्षापासून बागल गटाच्या ताब्यात आहे. लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल यांनी आदिनाथ कारखान्याला कर्जमुक्त केले होते. माजी आमदार शामलताई बागल व रश्मीदिदी बागल यांच्या नेतृत्वाखाली व विलासरावजी घुमरे (सर ) यांच्या मार्गदर्शनाखाली आदिनाथ कारखाना सहकार क्षेत्रात अग्रेसर राहावा यासाठी आदिनाथच्या सर्व संचालक मंडळाने अथक प्रयत्न केले आहेत. परंतु गेल्या सात ते आठ वर्षांपासून सहकारी साखर कारखाने चालवणे, टिकवणे व त्यामध्ये कारखान्यामधील वाढती स्पर्धा व आर्थिक पाठबळ नसल्याने कारखाने चालवणे अवघड होत चालले आहे.
आदिनाथ कारखान्याच्या सभासदांचा बागल या नावावर प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे याचा सभासद निश्चित विचार करतील याचा मला विश्वास आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरावे अर्ज छाननी प्रक्रियेनंतर याबाबत आमच्या नेत्या भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्षा व साखर संघ संचालिका रश्मीदिदी बागल व मार्गदर्शक विलासरावजी घुमरे (सर) हे अंतिम विचार विनिमयाच्या बैठकीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्याशी सविस्तर चर्चा करून त्यांचा सल्ला घेऊन कार्यकर्त्यांना पुढील सूचना देतील अशी ही माहिती शेवटी श्री. दिग्विजय बागल यांनी दिली.



