
प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी सौ. रुपाली भारत सुरवसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. कविता हनुमंत वारे यांनी आपला उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर सौ. रुपाली सुरवसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
या निवडीनंतर सरपंच अमृता प्रीतम सुरवसे यांच्या हस्ते रुपाली सुरवसे यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य आणि माजी सरपंच डॉ. दीपक सुरवसे, मेजर गुलाब खेडकर, प्रा. विजय रोडगे, माजी मुख्याध्यापक निवृत्ती सुरवसे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी उपसरपंच जयंत वारे, कुंडलिक सुरवसे, हनुमंत वारे, माजी सरपंच भोजराज सुरवसे, दिगंबर बागल पतसंस्थेचे अध्यक्ष बबन भाऊ सुरवसे, सचिव शंकर घनवट, विमा प्रतिनिधी विलासराव रोडगे, उद्योजक प्रीतम सुरवसे, बबन थोरात, बापू बागडे, ज्ञानदेव सुरवसे, महादेव सुरवसे, नंदू सुरवसे, मोहन वारे, बापू पवार, पप्पु सुरवसे, भारत किसन सुरवसे आदी मान्यवर उपस्थित होते.



