-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

“संजीवनी” ची बत्ती गुल म्हणून “अफवां” ची हूल; जुन्या पत्रांचा दाखला देत केली जातेय सभासदांची दिशाभूल

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये काल शेवटच्या सांगता सभेमध्ये माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती आदिनाथ बचाव पॅनल ने सुभाष चौक करमाळा येथे केलेल्या शक्ती प्रदर्शनानंतर विद्यमान आमदार नारायण पाटील यांच्या संजीवनी पॅनलची बत्ती गुल झाली असून मतदानाच्या पूर्वसंध्येला दि. १६ रोजी दिवसभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अफवांची हूल उठवून मतदारांना संभ्रमित केले जात आहे. यामध्ये आदिनाथ कारखाण्याबाबत चे जुन्या पत्रव्यवहारांचे दाखले देवून व बागल गटाचा “संजीवनी” ला पाठिंबा अशाप्रकारची दिशाभूल करून सभासद मतदारांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या चर्चा आता तालुक्यात रंगल्या आहेत.

 

आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला बँकेचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नाला यश आले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली कारखाना सुरू करण्याचे नारायण पाटील यांचे स्वप्न साकार होणार अशा अर्थाची दिशाभूल करणारी पोस्ट फिरत असून त्यामध्ये २०२३ – २४ सालचा जुना पत्र व्यवहार टाकला जात आहे. जसं काही आजच हे पत्र आलेलं आहे अशा पद्धतीने हूल उठवून सभासदांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. आठ – दहा दिवसांच्या प्रचारामध्ये ही दोन वर्षांपूर्वीची पत्र जर सभासदांना दाखविली असती तर आपले हसे झाले असते त्यामुळे कुठेतरी मतदारांना संभ्रमित करण्यासाठी असे शस्त्र “संजीवनी” कडून वापरले जाते. परंतु हे शस्त्र त्यांना उपायकारक ठरण्याऐवजी अपायकारकच ठरू शकते.

या निवडणुकीमध्ये बागल गटाची भूमिका तटस्थ असतानाही बागल कार्यालयातून आबांना सहकार्य करा असे फोन आलेले आहेत. असे सर्रास आबांच्या कार्यकर्त्यांकडून बागल गटांच्या सभासदांना सांगितले जात आहे. एवढेच काय तर कामगार युनियनने आबांना पाठिंबा दिला. बागल गटांने सहकार्याची भूमिका जाहीर केली आहे, अशा पद्धतीचे चित्र रंगविले जात आहे. एकूणच शेवटच्या टप्प्यांमध्ये संजीवनीची बत्ती गुल झाल्यामुळेच त्यांना अशी हूल उठवावी लागत आहे. अर्थातच बुडत्याला काडीचा आधार मिळणे अशक्य झाल्यामुळेच संजीवनी पॅनल कडून सभासदांची दिशाभूल केली जात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close