
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


मोरवड (ता. करमाळा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. त्यानंतर शालेय विद्यार्थ्यांना व लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आले. तसेच त्यांना वही व पेन भेट म्हणून देण्यात आले.
यावेळी तात्यासाहेब काळे पाटील, धर्मराज नाळे, बापू दिवटे, डॉ. बाळकृष्ण कांबळे, महेश काळे पाटील, ढोलारे मॅडम, पाटील सर, विजय कांबळे, अनिकेत कांबळे, करण कांबळे, अर्जुन कांबळे, अक्षय कांबळे, हनुमंत दिवटे, गिरीराज कांबळे, महेंद्र नाळे, बजरंग मोहोळकर, अमीर कबीर, वर्षाताई कांबळे, दिपालीताई कांबळे, प्रमिलाबाई कांबळे, पुजा काकी कांबळे, शुभांगी काकी नाळे यांच्यासह ग्रामस्थ व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




