-->
करमाळाविशेष

वडगाव (द) येथील जिल्हा परिषद शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त अभिवादन

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव द. (ता. करमाळा) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज सोमवार दि. १४ एप्रिल रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर भिमवंदना घेऊन शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंबादास थोरात व गोरख थोरात यांच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना अल्पोहार देण्यात आला.

 

यावेळी वडगावचे सरपंच प्रतिनिधी भाऊसाहेब काळे, माजी सरपंच महादेव गायकवाड, सुनील मुसळे, इब्राहिम पठाण, विकास गायकवाड, ईश्वर भांडवलकर, सचिन काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, उमेश भांडवलकर, विजय अंधारे, अक्षय शिंदे, संतोष शिंदे, जालिंदर टोणपे, बाळू शिंदे, इरफान शेख, हसन शेख यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक मणेरी सर, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस तसेच महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close