-->
करमाळाराजकिय

प्रहारचा अधिकृत उमेदवार नसल्याने पदाधिकारी संभ्रमात; वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून भूमिका स्पष्ट करू- सोमनाथ जाधव

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघात परिवर्तन महाशक्ती मधून प्रहार जनशक्ती पक्ष/ शेतकरी संघटनेचा अधिकृत उमेदवार नसल्याने प्रहारचे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाचा प्रचार करावा, याबाबत प्रहारचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील, वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच भूमिका स्पष्ट करू. अशी माहिती प्रहारचे तालुका उपप्रमुख सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

 

याबाबत अधिक बोलताना जाधव म्हणाले की, करमाळा- माढा विधानसभा मतदारसंघात प्रहार ला उमेदवारी मिळावी असा निर्णय घेण्यात आला. गेले पाच ते सात वर्षापासून मतदारसंघात अनेक शेतकरी, दिव्यांग, कामगार, तसेच अनेक लोकहिताची कामे प्रहारच्या माध्यमातून केली आहेत. त्यामुळे आ. बच्चुभाऊ कडू यांच्यावर विश्वास ठेवणारे मतदार संभ्रमात आहेत. करमाळा तालुक्यातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते यासंबंधी विचारणा करत आहेत.

 

सर्व कार्यकर्त्यांसह वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून मतदारसंघात जनतेच्या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या आणि प्रहारच्या विचारांशी सुसंगत असणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू. असेही जाधव यांनी शेवटी बोलताना सांगितले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close