-->
आरोग्यकरमाळा

उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ बदला; युवासेनेची मागणी

सोलापूर जिल्हा थंड हवेचे ठिकाण आहे का? युवासेनेचा संतप्त सवाल?

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

राज्यभरात सकाळ सत्रातील शाळा साडे आकरा पर्यंतच सुरू राहणार आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात साडे अकरा ऐवजी दुपारी साडे बारा पर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याने “सोलापूर जिल्हा थंड हवेचे ठिकाण आहे का?” असा संतप्त सवाल करत (ठाकरे गट) युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी शिक्षण विभागावर टिकेची झोड उठवली आहे. शिक्षण विभागाकडून निर्णय न बदल्यास तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील फरतडे यांनी दिला आहे. 

 

फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या तिव्र झळा बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी टंचाई बसू लागली होती. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी एक ते दिड किलोमीटर वाडी वस्तीवरून पायपीठ करावी लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषद च्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात (७\३० ते ११\३०) भराव्यात यासाठी शाळा व्यवस्थापन समीती ने ठराव दिले होते. युवासेनेकडुन देखील या मागणीस प्रसिद्धी पत्रक काढून पाठिंबा देण्यात आला होता. मात्र जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सकाळी ७\३० ते दु १२\३० पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश आल्याने पालक वर्गांच्या चिंतेत भर पडली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शिक्षण विभागाकडून या निर्णयाचा फेर विचार व्हावा. अशी मागणी पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. 

 

शाळेपासून आमचे घर एक किलोमीटर अंतरावर आहे. शाळेत जाण्यासाठी मुलांना पायी जावे लागत आहे दुपारी साडे बाराला शाळा सुटली तर मुलांना भर उन्हात पायपीठ करावी लागणार आहे. साडे अकराला शाळा सुटली तर बारा पर्यंत मुलं घरी येवू शकतात. 

-किरण मगर, हिवरे, पालक.

 

उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवा अशी मागणी होती. मात्र दुपारी साडे अकराला सोडा ही प्रमुख मागणी आहे. दुपारी साडे बाराला शाळा सोडणे म्हणजे वाडी वस्तीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जोखमेचे आहे, या निर्णयामुळे उन्हापासून सरंक्षण होणे तर लांबच पण उन्हाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे. त्यामुळेच शिक्षण विभागाचा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशातला प्रकार आहे.

– संजय कोठावळे,

(शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष, उमरड)

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close