-->
करमाळा

दैनिक लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार नासीर कबीर यांना मातृशोक; रशिदाबी कबीर यांचे ९१ व्या वर्षी निधन

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

करमाळा येथील दैनिक लोकमतचे पत्रकार, कमलादेवी औद्योगिक वसाहतीचे सचिव नासीरभाई कबीर तसेच करमाळा महसुल मंडल अधिकारी हुस्नोदिन कबीर यांच्या मातोश्री रशिदाबी शमसुद्दीन कबीर यांचे राहत्या घरी वयाच्या ९१ व्या वर्षी वृध्दापकाळाने दुखःद निधन झाले.

 

त्यांच्या पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. सैराट फेम सल्या उर्फ अरबाज शेख यांच्या त्या आजी होत्या. रशिदाबी कबीर यांचे रमजानच्या पवित्र महिन्यात निधन झाल्याने त्याला विशेष महत्त्व असुन रमजान महिन्यात निधन झाल्यानंतर त्यांना स्वर्गात स्थान मिळते अशी धारणा असल्यामुळे हे मरण पवित्र मानले जाते.

 

रशिदाबी कबीर यांची अंत्ययात्रा राहत्या घरापासून मोहल्ला गल्ली करमाळा येथुन सायंकाळी पाच वाजता निघाली होती. त्यांच्यावर आनंदबाग येथे आज अंत्यसंस्कार करण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close