श्रीदेवीचामाळ येथे शिवजयंती उत्साहात साजरी

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत असलेल्या श्रीदेवीचामाळ येथील श्रीमंत राजे रावरंभा निंबाळकर यांच्या पदस्पर्शाने पावन नगरीत श्रीमंत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहाने साजरा करण्यात आली. यावेळी श्रीदेवीचामाळ येथील शिवजयंती उत्सव समितीचे सौरभ चव्हाण, रोहित चौधरी, विनायक भोसले, वैभव पवार, आदित्य पवार यांनी अतिशय नियोजनबद्ध व शिस्तबद्ध शिवजयंती कार्यक्रम राबवून मिरवणुकीचे आयोजन केले. यामध्ये वेगवेगळे बँड पथक व राजे रावरंभा तरुण मंडळ श्रीदेवीचामाळ येथील लेझीम पथक विशेष आकर्षण होते. त्याचप्रमाणे शिवजयंती मिरवणूक काढून करमाळा शहरातील शिवछत्रपती चौक येथे छत्रपतींच्या शिवस्मारकाला भेट देऊन व विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
श्रीदेवीचामाळ येथील शिवजयंती उत्सव मिरवणुकीचे उद्घाटन श्रीदेवीचामाळचे नूतन सरपंच संतोष भाऊ पवार, करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड, मराठा महासंघाचे अध्यक्ष सचिन काळे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष सचिन भाऊ चोरमले, शिवसेना तालुका उपप्रमुख अंगद दादा बिडवे, माजी सरपंच श्रीराम आप्पा फलफले, प्रवीण हिरगुडे, प्रभाकर धोंडे, पोलीस पाटील मनोज जामदार, तुषार आबा जगताप, रोहित सोरटे, मनसेचे श्रीकांत चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित श्रीदेवीचामाळ येथील नागरिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी युवकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, सर्व ग्रामस्थ व गावकऱ्यांनी सहभाग घेऊन मिरवणुकीची सांगता केली.



