-->
करमाळाक्रीडा

श्री उत्तरेश्वर विद्यालयात समाधान कुर्डे यांची तलाठीपदी निवड झाल्याबद्दल व केम केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा सत्कार संपन्न

 

केम/प्रतिनिधी

 

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील माजी विद्यार्थी समाधान बजरंग कुर्डे यांची तलाठी पदी निवड झाली आहे. समाधान कुर्डे या माजी विद्यार्थ्याने सन २०१३-१४ मध्ये महाराष्ट्र राज्यस्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून प्रशालेचे नाव राज्यस्तरावर चमकवले आहे. कुर्डे यांची तलाठीपदी निवड झाल्याबद्दल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री वसंत तळेकर, प्रहार तालुका अध्यक्ष संदीप तळेकर, केम भाजपा अध्यक्ष श्री गणेश आबा तळेकर, सामाजिक कार्यकर्ते विष्णू तळेकर, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सागरराज तळेकर तसेच प्रशालाचे मुख्याध्यापक कदम एस.बी सर यांनी श्रीफळ, शाल व गुलाब पुष्प देऊन‌ या माजी विद्यार्थ्याचा सत्कार केला.

 

“मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा” कार्यक्रमांतर्गत केम‌ केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक वीरधवल गाडे, लहान गट कुस्ती स्पर्धेत प्रथम सानिका शिंदे, मुलांमध्ये लहान गट कुस्ती स्पर्धेत प्रथम वीर तळेकर, लहान गट लंगडी सांघिक स्पर्धेत द्वितीय क्रमांक कॅप्टन ज्ञानदा पळसे आणि मोठा गट कबड्डी स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक कॅप्टन उत्तरेश्वर कोरे आणि कबड्डी स्पर्धेतील सर्व खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी माजी विद्यार्थी बजरंग समाधान कुर्डे यांनी स्पर्धा परीक्षा आणि आपल्याला आलेले अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन जी.के जाधव सर यांनी केले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close