-->
करमाळाराजकियसामाजिक

हिवरे येथे शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ४७ जणांचे रक्तदान

युवासेनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात महिलांचाही उत्स्फूर्त सहभाग

 

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)

 

हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाकरे गट करमाळा युवासेनेच्या वतीने हिवरे (ता. करमाळा) येथे आज शुक्रवार दि. २६ जानेवारी रोजी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात एकुण ४७ रक्तदात्यांनी सहभाग घेऊन रक्तदान केले.

 

या प्रसंगी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन शिवसेना उपजिल्हाप्रमुख शाहूदादा फरतडे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शिबीराचे उद्घाटन ग्रामसेवक धारेकर भाऊसाहेब यांच्या हस्ते तर दिप प्रज्वलन सुरेश शिंदे गुरूजी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी युवासेना उपजिल्हाप्रमुख मयुर यादव, शहरप्रमुख समीर हलवाई, उपशहरप्रमुख अनिकेत केंगार, उपस्थित होते. सर्वांचे स्वागत युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी केले.

 

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विनोद पाटील, दिनेश पाटील, नवनाथ फरतडे, दिपक लावंड, पप्पू निकम, सुरज पुजारी, गणेश माने, आदिंनी परीश्रम घेतले. रक्तसंकलनाचे काम करमाळा येथील कमलाभवानी बल्ड बॅंकेच्या वतीने करण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close