-->
करमाळाराजकिय

सोलापूर लेबर सोसायटीच्या संचालकपदी मानसिंग खंडागळे यांची बिनविरोध निवड

 

करमाळा/प्रतिनिधी

 

सोलापूर डिस्ट्रिक्ट लेबर सोसायटीज को-ऑपरेटिव्ह फेडरेशन च्या २०२३-२४ ते २०२८-२९ संचालक मंडळाच्या निवडणुकीत करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे कट्टर समर्थक मानसिंग भैय्या खंडागळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. मानसिंग खंडागळे हे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय नारायण तात्या खंडागळे यांचे चिरंजीव आहेत.

 

संचालक मंडळांची पंचवार्षिक निवडणूक १० जानेवारी २०२४ रोजी जाहीर झाली होती. त्यानुसार १८ जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. १९ तारखेला अर्जाची छाननी होऊन २२ जानेवारी ते ५ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी मुदत होती. आज नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आ. संजयमामा शिंदे यांचे सूचनेनुसार करमाळा तालुक्यातून अर्ज दाखल केलेले दादासाहेब सावंत, शिवशंकर माने व बापूराव गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे मानसिंग भैया खंडागळे यांची निवड बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मानसिंग खंडागळे यांच्या निवडीबद्दल करमाळा तालुक्याचे आमदार संजयमामा शिंदे, माजी आ. जयवंतराव जगताप तसेच करमाळा तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close