-->
करमाळाराजकिय

राजुरीतील विविध विकास कामांची मा.आ. संजयमामा शिंदे यांच्याकडून पाहणी

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

करमाळा तालुक्याचे माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी राजुरी (ता. करमाळा) येथे प्रत्यक्ष भेट देऊन चालू असलेल्या विविध विकास कामांची पाहणी करून माहिती घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मा.आ. संजयमामा शिंदे यांनी करमाळा येथील संपर्क कार्यालयात जनता दरबार घेतला. त्यानिमित्ताने त्यांनी तालुक्यातील जनतेच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

 

राजुरी गावाच्या विकासाच्या दृष्टीने मैलाचा दगड असलेल्या राजुरी वीज उपकेंद्राला मा.आ. संजयमामा शिंदे यांनी आपल्या कार्यकाळात मंजुरी मिळवली व त्याचे काम आज युद्ध पातळीवर सुरू आहे. यामुळे राजुरीतील विजेची अत्यंत महत्त्वाची अडचण दूर होणार असून येत्या दोन महिन्यात हे वीज उपकेंद्र प्रत्यक्षात सुरू होणार आहे. याशिवाय करमाळा माढा मतदारसंघाच्या ग्रामीण विकासाचा केंद्रबिंदू असलेला राज्यातील सर्वाधिक लांबीचा हॅम या योजनेखाली मंजूर होऊन काम चालू असलेल्या सावडी ते वेणेगाव फाटा या रस्त्याच्या कामाची ही माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी पाहणी केली.

 

या ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी तब्बल २७१ कोटी रुपयांचा निधी असून हा रस्ता दुपदरी सिमेंट काँक्रिटीकरण आहे. या रस्त्यामुळे सावडी, राजुरी, पोधवडी, अंजनडोह, झरे, कुंभेज, कोंडेज, निंभोरे, मलवडी, व केम ही करमाळा तालुक्यातील ११ गावे तर उपळवटे, दहिवली, कनेरगाव व वेणेगाव ही माढा तालुक्यातील चार गावे अशी एकूण १५ गावे सोलापूर व पुणे या राष्ट्रीय महामार्गाला व नगर जिल्ह्याला जोडली जाणार आहेत.

 

यावेळी तानाजी झोळ, नंदकुमार जगताप, महादेव आडसूळ, वैभव पाटील, संजय सारंगकर, सुनील पाटील, भाऊसाहेब जाधव, सुहास गरुड, उदय साखरे, आर. आर बापू साखरे, दादा बापू साखरे यांच्यासह राजुरी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

राजुरी हे गाव उजनी बॅक वॉटर लगत असल्याने येथील विजेची समस्या मोठी होती. आदरणीय माजी आमदार संजयमामांनी आमची ही समस्या सोडवली असून त्याचा फार मोठा फायदा राजुरीतील शेतकऱ्यांना व गावाच्या विकासाला होणार आहे.

श्री.नंदकुमार जगताप, राजुरी.

 

राजुरी येथील विज उपकेंद्र, हॅम रस्ता, सरकारी दवाखाना, पूल, व्यायामशाळा, पंतप्रधान ग्रामसडक योजना यांसारखी असंख्य विकास कामे आमदार संजयमामांच्या कार्यकाळात मार्गी लागली.

श्री.आर.आर. बापू साखरे, राजुरी.

 

सावडी ते वेणेगाव फाटा या ७१ किलोमीटर लांबीच्या रस्त्यामुळे करमाळा तालुक्याच्या ग्रामीण विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.

श्री.भाऊसाहेब शेळके. सरपंच, सावडी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close