
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


दिल्ली विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला दिल्लीतील जनतेने बहुमताचा कौल देताच करमाळा भाजपाकडून जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या नेतृत्वामध्ये कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. करमाळा शहरातील गायकवाड चौक येथील भाजपा संपर्क कार्यालयासमोर भारत माता की जय, जय भवानी जय शिवाजी, भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देऊन परिसर दुमदुमून काढला व फटाक्यांची प्रचंड आतिषबाजी केली.
यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे म्हणाले की, आता दिल्लीत भाजपचे सरकार एकहाती बहुमताने आले आहे. केंद्रातही भाजपाचे सरकार आहे. सामान्य जनतेने केंद्र सरकारच्या कारभारावर, विकासकामावर व एकूणच ध्येयधोरणावर विश्वास टाकल्याने दिल्लीमध्ये भाजपचे सरकार आले. दिल्ली ही देशाची राजधानी असल्याने तिथे भाजपची सत्ता येणे गरजेचे होते. दिल्लीत सरकार आल्यामुळे तेथील जनतेला आता याचा मोठा लाभ होणार असून जागतिक पातळीवर दिल्लीचे महत्व माननीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली भविष्यात वाढणार आहे. भाजपच्या या विकासाला चालना देणाऱ्या व देश विकासाच्या गतीने पुढे नेणाऱ्या धोरणला दिल्लीतील मतदारांनी बहुमत देऊन पाठिंबा दिला आहे.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, सरचिटणीस काकासाहेब सरडे, नितीन झिंजाडे, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल पवार, उद्योग आघाडीचे तालुकाध्यक्ष आजिनाथ सुरवसे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष सोमनाथ घाडगे, सरचिटणीस गणेश वाळुंजकर, ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश ननवरे, शहर उपाध्यक्ष राजू सय्यद, नानासाहेब अनारसे, डॉ. किरण शिंदे, कमलेश दळवी, राजेश पाटील, नानासाहेब अनारसे, गौतम दळवी, राजेश पाटील, गणेश वाळुंजकर, सुनील नेटके, विनोद इंदलकर, महादेव गोसावी, गणेश गोसावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.




