-->
करमाळामाहिती विषयक

श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचा पाथूर्डी ग्रामस्थांच्या वतीने गुणगौरव संपन्न

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

 

श्री उत्तरेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, केम यांनी चालू शैक्षणिक वर्षी तिसरे डॉ. बापूजी साळुंखे साहित्य संमेलन अतिशय उत्कृष्टरित्या घेतल्याबद्दल पाथुर्डी ग्रामस्थ व चांदखान बाबा भजनी मंडळ यांच्या वतीने श्री उत्तरेश्वर जुनियर कॉलेज मधील गुरुदेव कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.

 

 

या कार्यक्रमात डॉ. बापूजी साळुंखे साहित्य संमेलनाचे कार्यवाह प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे, प्रा. अमोल तळेकर, प्रा. संतोष साळुंखे, प्रा. संतोष रणदिवे, प्रा. सतीश बनसोडे, प्रा. पराग कुलकर्णी यांचा चांदखनबाबा भजनी मंडळाच्या वतीने ट्रॉफी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

 

 

 

यावेळी प्रा. डॉ. मच्छिंद्र नागरे यांनी बोलताना डॉ. बापूजी साळुंखे साहित्य संमेलन घेण्यामागची भूमिका स्पष्ट केली. डॉ. बापुजी साळुंखे आणि केम परिसर यांचा घनिष्ठ संबंध होता. बापूजींच्या ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार या विचारांचा जागर होण्यासाठी दरवर्षी हे साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात घेतले जाते. या साहित्य संमेलनातून अनेक कवी, कथाकार, लेखक आकाराला येत आहेत. केंद्रप्रमुख श्री. महेश्वर कांबळे यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना साहित्य संमेलनाचे महत्त्व आणि त्याची उपयोजिता सांगितली. ह.भ.प. स्वप्निल महाराज शिंदे यांनी साहित्य संमेलनातील आनंद आणि आजचा विद्यार्थी यावर सुंदर व्याख्यान दिले. त्यांनी श्री उत्तरेश्वर कॉलेज मध्ये राबवित असलेल्या विविध उपक्रमाचे कौतुक केले.

 

 

 

यावेळी या कार्यक्रमास पाथुर्डी गावचे सरपंच श्री. संतोष मोटे, उपसरपंच श्री. प्रकाश खरात, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. आप्पासाहेब मोटे, ग्रामसेवक श्री. महेश काळे, ह.भ.प. श्री स्वप्निल महाराज शिंदे, केंद्रप्रमुख श्री. महेश्वर कांबळे, पोलीस पाटील श्री. विजय कोरे, पत्रकार श्री. शितलकुमार मोटे, श्री. उत्तरेश्वर कोरे तसेच पाथुर्डी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close