
प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


शेती पंपाच्या वीज बिल वसुलीसाठी महावितरण कंपनीकडून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे विज कनेक्शन वारंवार कपात करण्यात येते. तर शेती पंपाचा वीज पुरवठा बंद करण्याचा पर्याय सोडुन दुसरा पर्याय अवलंबला जावा. शेतकऱ्यांना २ ते ३ महिन्याला विज बिल वसुलीसाठी तगादा लाऊ नये. करमाळा तालुक्यातील मांगी तलावावर २० ते २५ गावांचा पिण्याच्या पाण्याचा व शेतीचा प्रश्न अवलंबून आहे. त्यामुळे मांगी तलावाबाबत आत्तापर्यंत झाले तेवढे राजकारण बंद करून व बाजूला सारून आपल्या काळात मांगी तलावासाठी कायमस्वरूपी पाण्याची सोय करावी.
तसेच करमाळा तालुक्यातील चार पैकी तीन साखर कारखाने सुरू असुन देखील अतिरिक्त ऊसाचा प्रश्न भेडसावत आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस शिल्लक राहण्याची शक्यता आहे. कारण तालुक्यातील कारखाने आपले कार्यक्षेत्र सोडून बाहेरचा ऊस उचलत आहे. तरी आपण शासकीय नियमानुसार संबंधित कारखान्यावर योग्य तीज कारवाई करून कारखान्यांना आपल्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणी साठी आदेश देण्यात यावेत. या प्रमुख तिन मागण्यांचे निवेदन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना देण्यात आले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवी गोडगे, तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिपक शिंदे, ता. युवा अध्यक्ष अमोल घुमरे, ता. पक्षाध्यक्ष बापू फरतडे, ता. उपाध्यक्ष तानाजी शिंदे, ता. युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर, शाखा अध्यक्ष अशोक लवंगारे, स्वा. नेते मारूती निळ, स्वा. नेते सिद्धांत सरोदे व ईतर शेतकरी उपस्थित होते.



