-->
करमाळासामाजिक

मांगी येथील जिल्हा परिषद शाळेत नवख्या विद्यार्थ्यांचे सुजित (तात्या) बागल यांच्या वतीने अनोखे स्वागत

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर (माय मराठी न्यूज)

 

नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मांगी (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये अनोख्या उपक्रमात चिमुकल्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. नुकतेच पहिली इयत्तेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल यांच्या वतीने गुलाब पुष्प, मिठाई व खेळणी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे, नुकतीच मोठी शस्त्रक्रिया झाल्यानंतरही सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे सुजित (तात्या) बागल यांनी कार्यक्रमाला हजेरी लावून आपली सामाजिक बांधिलकी जपली.

 

या वेळी बोलताना सुजित तात्या बागल म्हणाले की, “या शाळेत जे पालक त्यांच्या मुलांचा पहिली इयत्तेमध्ये प्रवेश घेतील, त्यांची संपूर्ण एक वर्षाची घरपट्टी मी स्वतः भरणार आहे.” पुढे त्यांनी सांगितले की, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या दिवसेंदिवस घटत असून अनेक ठिकाणी वर्ग बंद पडण्याच्या स्थितीत आहेत. अशा उपक्रमांमुळे शाळेतील विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

 

या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक कवळे सर, शिक्षिका सौ. सुवर्णा महामुनी, सौ. पवार मॅडम, सौ. देमुंडे मॅडम, तसेच शालेय व्यवस्थापन समिती सदस्य उमेश बागल, निखिल बागल, पोलीस पाटील आकाश शिंदे, किशोर बागल, शिवाजी राऊत यांच्यासह ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुजित बागल यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close