माय मराठी न्युज


पुणे जिल्ह्यातील भोसरी येथे दि.१८/०८/२०२१ रोजीच्या रात्री अँड. मंगेश नढे ( गोरक्षा प्रमुख, बजरंग दल, पश्चिम महाराष्ट्र प्रांत ) यांना बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की, भोसरी येथून अशोक लेलेंड गाडीमधून गायी कोंढवा येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार आहेत. त्यांनी लगेचच गोरक्षा सहप्रमुख अभिजित चव्हाण यांना याबाबत माहिती देऊन नाशिक फाटा पुलाखाली येऊन थांबण्यास सांगितले. सदर गाडी रात्री ११:४५ च्या सुमारास पिंपरी चिंचवड गोरक्षा प्रमुख निलेश चासकर, सहप्रमुख अभिजित चव्हाण, संकेत भालेराव, सुमीत बोऱ्हाडे, नितेश दरवडे या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पोलिस कन्ट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांच्या मदतीने अडवली.
पोलिसा समक्ष त्यांनी सदर गाडीची पाहणी केली असता त्यांना त्यात ३ गायी कोंबून भरल्या असल्याचे दिसून आले. गाडीतील गायींना जखमा झालेल्या होत्या तसेच त्या गायींच्या चारा पाण्याची कसलीही व्यवस्था सदर गाडीमध्ये केलेली नव्हती. गाडी चालकास गायी कोठे घेऊन जात आहे याविषयी विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर पोलीस व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी टेम्पो भोसरी पोलीस स्टेशन ला आणुन सदर आरोपीं विरुद्ध प्राणी संरक्षण कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला. तसेच कत्तलीपासून सुटका केलेल्या गायी भोसरी पांजारपोळ गोशाळा येथे सुखरूप सोडण्यात आल्या. या कारवाईत सहकार्य केलेल्या भोसरी पोलीसांचे तसेच भोसरी पांजारपोळ गोशाळेचे विश्व हिंदु परिषद बजरंग दलाचे अँड. मंगेश नढे गोरक्षा प्रमुख बजरंग दल प. महाराष्ट्र प्रांत यांनी आभार मानले.



