गद्दारांचा राजकीय बंदोबस्त मीच करणार, तुम्ही फक्त मतदानाकडे लक्ष द्या- आ. रोहितदादा पवार

प्रतिनिधी/कर्जत (माय मराठी न्यूज)


सर्वकाही दिलेले असतानाही खोटे आरोप करून गद्दारी करणाऱ्या गद्दारांचा राजकीय बंदोबस्त मीच करणार आहे. तुम्ही फक्त आपल्या गावामध्ये मला जास्तीत जास्त मताधिक्य कसे देता येईल याकडे लक्ष द्यावे. असे आवाहन कर्जत जामखेड चे आमदार रोहित दादा पवार यांनी केले. ते रविवार दि. २७ ऑक्टोबर रोजी मौजे जळकेवाडी (ता. कर्जत) येथे गाव संवाद दौऱ्या प्रसंगी बोलत होते. याप्रसंगी सचिन पवार, हरिभाऊ कोकाटे, मिनीनाथ मांढरे, सुनील शेलार, श्रीमंत आबा शेळके यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
पुढे बोलताना आ. रोहीतदादा पवार म्हणाले की, आपल्या विरोधकांकडे मतदार संघाच्या विकासाचे विषय नसल्यामुळे ते वैफल्यग्रस्त होऊन माझी कपडे, गाडी यावर वैयक्तिक बोलत आहेत. कर्जत जामखेड चा सर्वांगीण विकास करून आपल्या मतदारसंघाचा नावलौकिक देशात करण्यासाठी तुम्ही मला पाठबळ द्या. माझे घर फुटले, पक्ष फुटला तरीही मी घाबरलो नाही, त्यामुळे असे कितीही गद्दार फुटले तरी तुम्ही काळजी करू नका त्यांचा बंदोबस्त मी करतो. या अगोदर जशी तुम्ही मला साथ दिली तशीच यापुढेही साथ द्या, माझे कुटुंब म्हणून मी कायम तुमच्या सुख दुःखामध्ये तुमच्या सोबत असेन, असा विश्वासही त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिला.
आमदार रोहितदादा पवार यांनी जळकेवाडी येथील ग्रामस्थांशी संवाद साधताना निम्म्याहून अधिक वेळ शालेय मुलांशी गप्पा मारल्या. लहान मुलेही त्यांच्याच एखाद्या मित्राशी गप्पा मारत असल्यासारखे आ. रोहितदादा पवार यांच्याशी बिनधास्तपणे बोलत होती. जळकेवाडी ग्रामस्थांच्या वतीने श्रीमंत शेळके, अनिल निंबाळकर, सुनील शेलार, प्रसाद ढोकरीकर, किसन रणसिंग, अंकुश निंबाळकर, दत्तू घायतड, बाळु बर्डे यांचाही या ठिकाणी शाल, श्रीफळ व फेटा घालून सन्मान करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब पवार (मेजर), दिलीप पवार, सुनील पवार, भाऊसाहेब पवार, रवींद्र पवार, प्रमोद जाधव, यशवंत मोरे, गजानन मुळीक, दादा पावणे, योगेश पवार, चौरंग पवार, गणेश शिर्के, प्रवीण मुळीक, अनिल पवार, बाळासाहेब शेलार, विक्रम मोरे, पंडित पवार, विक्रम पांढरे, निरंजन शिर्के, महादेव पवार, विलास पवार, शिवाजी पवार, मारुती पवार, नामदेव ढवळे, अमोल चोपडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



