-->
आरोग्यकरमाळाराजकिय

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात अखेर कायमस्वरुपी भूलतज्ञ दाखल

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञाची नियुक्ती; आमदार संजय मामा शिंदे यांच्या मागणीला यश

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञाची नियुक्ती व्हावी यासाठी आ. संजयमामा शिंदे सातत्याने प्रयत्न करत होते. या संदर्भात आरोग्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडेही त्यांचा पाठपुरावा सुरू होता. या पाठपुराव्याला अखेर यश आले असून बदली प्रक्रियेमध्ये करमाळा तालुक्यासाठी उपजिल्हा रुग्णालय परांडा येथील डॉ. अंकुश भाऊराव पवार यांची कायमस्वरूपी भूलतज्ञ म्हणून नियुक्ती झालेली असून ते प्रत्यक्षात हजर झाले आहेत. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे सिझेरियन व इतर शस्त्रक्रियेसाठी भुलतज्ञ आत्ता २४ तास उपलब्ध राहतील अशी माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.

 

याविषयी अधिक माहिती देताना ते म्हणाले की, २०१९ ते २४ या कार्यकाळामध्ये पूर्णवेळ कायमस्वरूपी भुलतज्ञ करमाळा तालुक्यासाठी लाभला नसला तरीही हंगामी स्वरूपात, कंत्राटी भूलतज्ञ या उपजिल्हा रुग्णालयाला मिळाले त्यामधून जवळपास ७०० मोफत सिझेरियन शस्त्रक्रिया या उपजिल्हा रुग्णालयामध्ये पार पडल्या. त्यामुळे तालुक्यातील गोरगरीब जनतेचे लाखो रुपये वाचले. तालुक्यातील जनतेला चांगली आरोग्य सुविधा लाभावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असून दवाखान्याचे श्रेणीवर्धन करून १०० खाटाच्या दवाखान्याचे बांधकाम आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. यातील २० बेड हे अतिदक्षता विभागाचे आहेत. याबरोबरच रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या वसाहतीचे बांधकाम वेगात सुरू असून करमाळा तालुका आरोग्य विषयक सुविधांनी संपन्न करणे हेच आपले उद्दिष्ट आहे असेही ते म्हणाले.

 

दिव्यांगांना प्रमाणपत्र देण्याची सुविधा, डिजिटल एक्स-रे मशिन इत्यादी सुविधा रुग्णांना आता मोफत मिळत असून इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर अतिदक्षता विभागही येथे सुरू होणार आहे. मोफत डायलिसिस सेंटर ही स्टाफ नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे. लवकरच तेही सुरू होईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close