
प्रतिनिधी/ ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)


सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या निधीतून करमाळा तालुक्यातील धायखिंडी ते करंजे या रस्त्यासाठी ७३.७५ लाख रुपये निधी मंजूर झाला असून या कामाचे भूमिपूजन गणेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी पुढे बोलताना गणेश चिवटे म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व माढा लोकसभेचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नातून आपण धायखिंडी ते करंजे या रस्त्याच्या कामासाठी ७३.७५ लाख रुपये निधी उपलब्ध केला आहे. करंजे गावचे मा. सरपंच काकासाहेब सरडे यांनी हा रस्ता खूप खराब असून या रस्त्यावरून ये-जा करताना शालेय विद्यार्थी व शेतकऱ्यांना अत्यंत अडचणी येत असल्याने रस्ता मंजूर करण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला असल्याचे गणेश चिवटे यांनी सांगितले.
यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पै. अफसर तात्या जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे, बंडू शिंदे, वंजारवाडीचे सरपंच प्रवीण बिनवडे, झरे चे ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ घाडगे, धायखिंडीचे हर्षल शिंगाडे, माजी सरपंच महादेव वायकुळे, ग्रामपंचायत सदस्य दादासाहेब वायकुळे, आत्माराम वायकुळे, वैजिनाथ महानवर, मनसुर मुलाणी, करंजे येथील आदिनाथ कारखान्याचे माजी संचालक पोपटबापू सरडे, सरपंच सुभाष सरडे, सोसायटीचे चेअरमन यशवंत पवार, माजी सरपंच राजेंद्र जाधव, विजयकुमार बाबर गुरजी, ग्रामपंचायत सदस्य गणेश सरडे, तंटामुक्ती अध्यक्ष मच्छिंद्र सरडे, रावसाहेब सरडे, बाबासाहेब निकम, रणजीत पवार, नितीन पवळ, संजय सरडे, जनार्दन पवळ, प्रदीप साबळे, नितीन सरडे, आण्णासाहेब गोडगे, उद्धव सरडे, रवी शिंदे, पप्पू शिंगाडे, बापू महानवर, सौदागर शिंदे, प्रशांत जाधव, अभिजीत दळवी, ऋतुराज पालखे, गुरलिंग गोडगे, चंद्रकांत सरडे, विकी सरडे, किरण बागल, भैय्या कुंभार, किरण शिंदे, वसीम सय्यद, मंगेश मुरूमकर, गणेश गोसावी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.




