वढू खुर्द मध्ये राष्ट्रीय पोषण माह सांगता कार्यक्रम उत्साहात संपन्न
कोरेगाव भीमा प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील


हवेली तालुक्यातील वढू खुर्द येथील अंगणवाडी मध्ये राष्ट्रीय पोषण माह सांगता कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी हवेली पंचायत समिती सदस्या संजीवनी कापरे, वढू खुर्दच्या सरपंच मोहिनी सचिन भोंडवे, ग्रामपंचायत सदस्या रसिका अनिल चोंधे, वंदना निवृत्ती दरेकर, लोणीकंद बिट च्या पर्यवेक्षिका योगिता कोळी तसेच आशा वर्कर अश्विनी भोंडवे या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
या कार्यक्रमात पोषण गुढीचे, ओटीभरणाचे तसेच वढू खुर्द मधील महिलांनी बनवून आणलेल्या विविध प्रकारच्या पाककृतींचे प्रदर्शन मांडण्यात आले. या कार्यक्रमात वढू खुर्द मधील महिलांनी आपला उस्त्फुर्त सहभाग घेतला. या कार्यक्रमाचे आयोजन अंगणवाडी सेविका आशा प्रकाश पातोंड व मदतनीस नंदिनी निळेकर यांनी केले.




