माढ्यात शिवतेजसिंह पाटलांकडून तुतारीचा प्रचार सुरू; उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त वह्यांचे वाटप

प्रतिनिधी/माढा (माय मराठी न्यूज)


आगामी विधासभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाध्यक्ष मा. शरद पवारांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे येथे सोलापूर जिल्ह्यातील इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या तर दुसरीकडे शिवतेजसिंह मोहिते- पाटील यांनी माढा विधानसभा मतदारसंघात तुतारी चिन्ह असलेल्या एक लाख शालेय वह्या वाटपाचे नियोजन करण्यात आले असून त्याची सुरुवात मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील करकंब येथून शालेय मुलांना तुतारी चिन्ह असलेल्या वह्याचे वाटप करून करण्यात आली आहे.
यावेळेस शिवतेजसिंह मोहिते पाटील म्हणाले की, उद्योग महर्षि उदयसिंह मोहिते पाटील यांच्या जयंती निमित्त माढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घरोघरी पोहचवण्याचा तसेच शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी वह्याचे वाटप पूर्ण माढा विधानसभा मतदारसंघात करणार असल्याचे सांगितले.
गत लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या माढा विधानसभा मतदारसंघातील प्रचार यंत्रणेची धुरा त्यांचे बंधू शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी माढा राबवली होती आणि तेथून त्यांनी ५६००० लिड देखील घेतले होते. सध्या माढा विधानसभेसाठी शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांचे देखील नाव चर्चेत आहे. निवडणुक लढवण्याची तयारी देखील सुरू असल्याचे बोलले जात आहे त्या दृष्टीनेच पक्षाचे चिन्ह संपूर्ण मतदारसंघात पोहोचावे यासाठी त्यांनी हा कार्यक्रम हाती घेतला आहे असे राजकीय जाणकार सांगत आहेत.
यावेळी शिवाजी कांबळे, दीपक वाडदेकर, सतीश देशमुख सर, संजय खडके, शरद पांढरे, नागेश वंजारी, रघुनाथ जाधव, डॉक्टर प्रशांत मोरे, सुनील दुधाने, किरण घाडगे, महेंद्र शिंदे, मनोज शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.



